- एरंडोल – तालुक्यातील पातरखेडा येथे आश्रमशाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,यावल चे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचे हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील हे होते.याप्रसंगी आश्रमशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टि – शर्ट चे वाटप करण्यात आले.
- यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील,विन्यास गायकवाड, आश्रमशाळेचे सचिव विजय पाटील,अजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र तिरभाने यांनी केले.
खेळामुळे निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते.या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होते.असे विचार प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.