- एरंडोल प्रतिनिधी — येथील डीडीएसपी महाविद्यालयाच्या १९ वर्ष मुलांच्या व मुलींच्या बास्केटबॉल संघाला जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय मिळवण्यात यश प्राप्त झाले. सदर संघाची विभागीय स्तरावर नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत विजयी मुला मुलींच्या संघचा संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ.ए. जे. पाटील, समन्वयक डॉ. अरविंद बडगुजर,एन.ए.पाटील. उपप्राचार्य प्रा. आर एस पाटील. यांनी विजय संघाच्या खेळाडूंची अभिनंदन केले. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. मनोज पाटील यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.