एरंडोल, प्रतिनीधी — राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी जोरदार
तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र राज्यात यंदा अनेक
उमेदवारीमुळे राजकीय
पक्षांच्या , अपक्षांच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. पारोळा येथील आरोग्यसेवक डॉ . संभाजी राजे पाटील यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी शहरातून मोठ्या
जनसमुदायासह वाजत गाजत बैलगाडी वर रॅली काढूनशेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दिसुन आले
तसेच रॅलीत महिलांची उपस्थीती डॉ.संभाजी राजे पाटील यांनी केलेल्या सामजिक कामामुळे दिसुन आली आरोग्य सेवक डॉ.संभाजी राजे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत या महापुरुषांना अभिवादन केले. गेल्या काही मतदारसंघातील महिन्यांपासून त्यांनी गावांमध्ये जाऊन समाजोपयोगी कामे करीत नागरिकांशी सुसंवाद साधला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना एरंडोल याठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला यावेळी एरंडोल, पारोळा व भडगाव येथील बहुसंख्य मतदार रॅलीत सहभागी झाले होते. यात पुरुषांसोबत महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान डॉ . सभाजी राजे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रस्थापितांना नक्कीच हादरा बसणार आहे.