-
१६ एरंडोल विधानसभा निवडणूक मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात तर ७ उमेदवारांची माघार…!
एरंडोल ( प्रतिनिधी )
एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ७ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार रिंगणात आहेत.त्यात ३ उमेदवार राजकीय पक्षांचे असून अपक्ष उमेदवारांची संख्या १० आहे.यावेळी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संपूर्ण कामकाजात एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, मुख्याधिकारी अमोल बागुल व निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव यांनी सहाय्य केले.
विशेष म्हणजे चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.तर शिवसेना उबाठा गटाचे नानाभाऊ महाजन आमदार चिमणराव पाटील व काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.