-
*दिवाळी अंक हे लिहित्या हातांचे दिशादर्शक असतात* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे*
*साप्ता.बडगुजर उवाच दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न* -
जळगाव प्रतिनिधी — दिवाळी अंकांनी लेखनकर्त्यांच्या किती तरी पिढ्या समृद्ध केल्या.त्यांना जनमानसात ओळख मिळवून दिली.महाराष्ट्रातून किती तरी वृत्तपत्रे आणि दिवाळी अंक प्रकाशित होतांना दिसतात. साप्ताहिक बडगुजर उवाच आणि साप्ताहिकाचा दिवाळी अंक जिल्ह्याच्या साप्ताहिक विश्वात आपली ओळख पंचेचाळीस वर्षांपासून टिकवून आहे.ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.असे भावोदगार खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.जळगाव येथील साप्ताहिक बडगुजर उवाच च्या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ आज दि.२४ नोव्हेम्बर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता एम आय डी सी एरिया,राजस गृहोद्योग मंदिर जळगाव येथे संपन्न झाला.दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा.आंधळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.सामारंभाच्या अध्यक्षस्थानी पहुर येथील लोकप्रिय डॉ.रविंद्र वसंतराव बडगुजर होते.
प्रा.आंधळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की बडगुजर उवाचचे संस्थापक संपादक कवी तथा लेखक श्री.द.शं. बडगुजर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेली लोकसेवा आणि समाजसेवा स्पृहणीय असून तोच वारसा वसा म्हणून त्यांचा सुपुत्र नरेंद्र बडगुजर व सौ.दिपाली बडगुजर,यांनी समर्थपणे पेलल्याचे समाधान त्यांनी नोंदवले.त्याचवेळी द.शं दादा व सौ.प्रमिला वहिनी बडगुजर यांच्या श्रमनिष्ठेचाही मनस्वी गौरवोल्लेख करतांना दिवाळी अंकास देखणं रूप देणारे खगेंद्र बडगुजर यांच्या कलात्मक दृष्टीचेही कौतुक करीत संतोष बडगुजर आणि परिवरातल्या इतर सदस्यांना दिवाळी अंकाचे श्रेय दिले.
समारंभाच्या प्रमुख मान्यवरांची व समारंभ अध्यक्षांची मनोगते सदर प्रसंगी यथोचित झालीत.त्यात बापूसाहेब विठ्ठल ओंकार बडगुजर,अहिराणी साहित्य परिषद धुळे या संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील,शिरपूर बडगुजर समाजाचे अध्यक्ष धर्मेंद्र पोपटराव बडगुजर व डॉ.रविंद्र बडगुजर यांनी आपल्या। सद्भावना नोंदवीत शुभेच्छा दिल्या.
समारंभास जिल्ह्यातून समाज बांधव तसेच साहित्यिक डॉ.बापूराव देसाई, कवी भगवान भटकर,कवयित्री इंदिरा जाधव,विजय हिरालाल करोडपती,कवी तथा शाहीर निंबा पुना बडगुजर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सांगता कवी निंबा बडगुजर यांनी लिहिलेल्या पोवाड्याने करण्यात आली.
सूत्र संचलन व आभार प्रदर्शन प्रकाश बडगुजर सरांनी केले.