- *एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन….!*
एरंडोल – येथे तालुक्यातील सकल हिंदू समाज व करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मुक रॅली काढून बांगलादेशी अल्पसंख्याक, मानवाधिकार व जीवांचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी १० डिसेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.नायब तहसीलदार संजय घुले, यांनी निवेदन स्विकारले.
मुक रॅलीचा प्रारंभ एरंडोल पंचायत समिती कार्यालयापासून होऊन मरिमाता चौक, म्हसावद नाका मार्गे जाऊन तहसील कार्यालयापर्यंत मुक रॅली पोहचली.
बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता व जीवांचे हानन,मंदिरावर झालेले हल्ले, तोडफोड, अमानवी अत्याचार आदी बाबींचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना प्रसाद दंडवते, जगदीश ठाकूर, डॉ.नरेंद्र पाटील,प्रा.मनोज पाटील, कुणाल महाजन,आर.डी.पाटील, गणेश पाटील,वसंता पवार, ज्ञानेश्वर बडगूजर,भरत महाजन, कुणाल पाटील,संध्या पाटील, जयश्री पाटील,आरती ठाकूर,शितल चौधरी आदी उपस्थित होते.