इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत ; राज्य माहिती आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय;आरटीआय कार्यकर्ते ऍड. दिपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव-(प्रतिनिधी)- येथील रक्त पेढी क्षेत्रातील नामवंत असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी,जळगाव ही संस्था माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत असल्याने त्यांनी जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांची अधिनियमाच्या कलम ५(१) मधील तरतुदीनुसार नियुक्ती करण्याचे व अर्जदार दिपक सपकाळे यांनी मागणी केलेल्या असर्जनुसार माहिती विनामूल्य पुरविण्याचे आदेश बिपीन गुरव,राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांनी दिले