दोनही रस्त्यांच्या विकासकामामुळे दळणवळण होणार सुलभ; नागरिकांच्या समस्या आता संपणार – आमदार मा. अमोलदादा पाटील
एरंडोल प्रतिनिधी- तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन दळणवळण करणाऱ्या नागरिकांकडून खर्ची ते चोरटक्की व कढोली ते सावदा या रस्त्यांच्या दुरुस्तीची दीर्घकाळापासून जोरदार मागणी होत होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोलदादा पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या दोन्ही रस्त्यांच्या विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर करून आणला. कढोली ते सावदा रस्त्यावर जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी