Home » शैक्षणिक » प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे विभागीय अध्यक्षांना निवेदन…

प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे विभागीय अध्यक्षांना निवेदन…

  1. प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे विभागीय अध्यक्षांना निवेदन…

    एरंडोल प्रतिनिधी ;-शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
    निवेदन देताना संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख (एरंडोल गटशिक्षणाधिकारी)राजेंद्र महाजन, विभागीय अध्यक्ष विजय पवार व सचिव निलेश पाटोळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष वसंत खैरनार व सचिव खालील शेख, राजेंद्र बोडके ,भाऊसाहेब जगताप हे पदाधिकारी उपस्थित होते.
    मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पद शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करून त्यास सामान्य राज्यसेवा गट अ राजपत्रित सेवांमध्ये समाविष्ट करावे, शिक्षण सेवा गट/ब प्रशासन शाखा शाखा चे सेवा प्रवेश नेम २८ डिसेंबर २०२२ मध्ये बदल करून शिक्षण सेवा गट-ब प्रशासन शाखा चे पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करून त्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गास ५०% कोटा निश्चित करावा, वेतनासोबत आठ हजार प्रवास भत्ता मिळावा. उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या पदोन्नतीची सेवा जेष्ठता यादी तात्काळ अंतिम करावी, श्रेणी तीन या पदावर पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ मिळावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!* *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*