-
*माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा पुर्व वैमनस्यातून घातपात झाल्याचे निष्पन्न,३ आरोपींना अटक……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे जवळपास दोन आठवड्यांपूर्वी भालगांव बोरगांव रस्त्यावर येथील माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा अपघाताचा बनाव करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार वय ४० वर्षे,शुभम कैलास महाजन वय १९ वर्षे,पवन कैलास महाजन वय २० वर्षे सर्व राहणार एरंडोल यांना पोलिसांनी अटक केली आहे.पुर्व वैमनस्यातून हा घातपाताचा प्रकार केल्याचे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार या आरोपीने जबाबात कबूल केले आहे.बोलेरो चारचाकी गाडी आरोपी बदक याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगांव या यंत्रणेच्या २ पथकांनी घटनास्थळाचा परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले.त्यांच्या अथक परिश्रमातून दशरथ महाजन यांचा अपघात झाला नसून घातपात झाल्याचे निष्पन्न झाले.आरोपीतांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगांव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगांव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक एरंडोल निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, हरिलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, अक्रम शेख, प्रविण भालेराव, रवि कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, प्रशांत पाटील, यांच्या पथकाने परिश्रम घेतले