- *अंजनी धरणात ४१ टक्के पाणीसाठा…….!*
एरंडोल – एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांसह इतर १० ते १५ गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या अंजनी धरणात २३ जुलै २०२५ या तारखेपर्यंत ४१ टक्के जलसाठा असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे एरंडोल उपविभागाचे उप विभागीय अभियंता कुलदीप पाटील यांनी दिली.गेल्या ५ दिवसांपासून अंजनी धरणातील आवक पावसा अभावी शुन्य आहे.दरम्यान गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात धरण १०० टक्के भरले होते.अजूनही निम्मे पावसाळा शिल्लक असल्याने या वर्षी सुध्दा अंजनी धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल.असा जाणकारांचा अंदाज आहे.
एरंडोल तालुक्यात मे महिन्यात अवकाळीचा दमदार पाऊस झाला.मात्र जुन, जुलै महिन्यात भिज पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही.त्यामुळे नदी, नाले व ओढे अजुनही कोरडेठाक आहेत.खरीप पिकांची स्थिती चांगली असली तरी दमदार पाऊस झाल्याशिवाय विहीरींची पाणी पातळी वाढणे शक्य होणार नाही.विशेष हे की जवळपास आठवडाभरापासून दररोज दुपारपर्यंत उन्हाळा तर दुपारून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण तयार होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोटातून चिंता व्यक्त केली जात आहे

