-
अंजनी धरण ९० टक्के भरले.
एरंडोल धरणगाव परिसरासाठी गुड न्यूज…!
एरंडोल प्रतिनिधी :- एरंडोल व धरणगाव तालुक्यासाठी लाईफ लाईन असलेले अंजनी धरण ९० टक्के पाण्याने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे त्यामुळे ३५० क्यूसेक्स ने अंजनी नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी झाल्यास वीसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल. तरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व गिरणा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी कुलदीप पाटील यांनी दिला आहे.
नदी काठावरील नागरिकांनी पशुधन चीज वस्तू शेती मोटार पंप गुरे ढोरे सुरक्षितेच्या दृष्टीने सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात बांधकामे सुरू आहेत सदर विभागांना देखील सुचित करण्यात येते की त्यांनी आपले चीज वस्तू बांधकाम साधने साहित्य योग्य ठिकाणी हलविण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे कळविण्यात आले आहे.
