- *आईचा मृत्यू झाल्यावरही विद्यार्थीनीने धाडसाने दिला बारावीचा पेपर….!*
![]()
एरंडोल- आईचा अचानक मृत्यू झालेला असतानाही एरंडोल येथील भोई गल्लीत राहणाऱ्या मुलीने धाडस करून बारावीची पेपर दिला.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी आईचा निजामपूर येथे माहेरी ऊपचारा दरम्यान दुपारी २वाजता अचानक मुत्यृ झाला. निजामपूर माहेरवरून आईचा मृतदेह सासरी एरंडोल येथे आणण्यात आला आणि १ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता तिच्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तरीही मुलगी सविता हीने आपले दु:ख डोळ्यात साठवून दुपारी २ वाजता अर्थशास्त्र या विषयाचा पेपर दिला.तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरात कोणाचा तरी मृत्यू झालेला असताना कोणतेही काम करण्याची कल्पनाच करवत नाही.परीक्षेला जाणे तर दूरचीच गोष्ट आहे. त्यात जन्मदात्या आईचा मृत्यू म्हणजे आभाळ फाटल्यासारखीच परिस्थिती असते. तरीही एरंडोल येथील भोई गल्ली परीसरात राहणाऱ्या सविता सुभाष भोई हिने बारावीची परीक्षा दिली. तिची आई सुरेखा सुभाष भोई वय ४० वर्षे यांचा मृत्यू अचानक शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास झाला. यामुळे घरात दुखा:चा डोंगर कोसळला.याप्रसंगी सविता भोई तिच्या चार बहीणीसह वडीलांनी आक्रोश सुरू केला. प्रत्यक्ष जन्मदात्रीच्या मृत्युमुळे कोणालाच दुख: सहन होत नव्हते.सविताने हा पेपर दिला नसता तर तिचे शैक्षणिक नुकसान झाले असते. मोल मजुरी करणारे सविताचे वडील सुभाष भोई तसेच अन्य कुटुंबीयांनी सविताला पेपरसाठी जाण्यास प्रवृत्त केले. मनावर दगड ठेवून सर्व दुख: गिळून तिने दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महावीद्यालयाचा केंद्रात परीक्षा दिली.सविताच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.