- एरंडोल – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आचारसंहिता लागू झालेली आहे.आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे राजकीय बॅनर, होर्डिंग्ज,झेंडे हे काढण्याचे काम ७२ तासांच्या आत करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११ वाजता बी एस एन एल प्रशासकीय इमारतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रदीप पाटील( तहसीलदार एरंडोल ), उल्हास देवरे ( तहसीलदार पारोळा ), एन टी भालेराव ( निवडणूक नायब तहसीलदार )यांची उपस्थिती होती.
एरंडोल विधानसभा मतदारसंघा अंतर्गत एकूण २९८ मतदान केंद्रे असून त्यापैकी मतदान केंद्र सुसुत्रीकरणानुसार नवीन ८ मतदान केंद्रे आहेत.सहाय्यकारी मतदान केंद्र एकही नाही.लोकसभा निवडणुकीनंतरच्या ७ महिन्यात ७ हजाराने मतदार संख्येत वाढ झाली आहे.एकूण मतदार संख्या २ लाख ९२ हजार ३५१ इतके आहे.त्यात पुरूष मतदार १ लाख ५० हजार ०५३ व स्री मतदार १ लाख ४२ हजार २८८ आहेत.तृतीय पंथी मतदार १० आहेत.१८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ६ हजार ९१९ इतकी आहे.१०० पेक्षा जास्त वय असलेले मतदार ४८ आहेत.२ हजार ९३६ मतदार ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.१६४५ मतदार दिव्यांग आहेत.
८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार व दिव्यांग मतदारांकरिता गृहभेट मतदानाचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी १० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही पथके घरोघरी जाऊन सदर मतदारांचे मत उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांचे उपस्थितीत गोपनीयता राखून नोंदवून घेणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुलभ रित्या पार पाडण्यासाठी १८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यात १८ नोडल अधिकारी व १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
२२ ऑक्टोबर २०२४ निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे.२९ ऑक्टोबर २०२४ नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम दिनांक.३० ऑक्टोबर २०२४ नामनिर्देशन पत्रांची छाननी.४ नोव्हेंबर २०२४ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक.२० नोव्हेंबर २०२४
- मतदानाचा
- दिवस.२३ नोव्हेंबर २०२४ मत मोजणीचा दिवस.२५ नोव्हेंबर २०२४ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक.