एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील विखरण येथे कल्पना शामकांत पाटील व पती शामकांत पाटील या दाम्पत्यानी नवरात्रोत्सवानिमित्ताने गावातील एकविरा देवीची आरती केल्याच्या कारणावरून आरोपींनी शामकांत युवराज पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.तसेच सदर जोडप्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी घडली.याप्रकरणी कल्पना पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपींवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये ज्ञानेश्वर उत्तम पाटील, गणेश सजन पाटील, विनोद उत्तम पाटील,भारत पितांबर पाटील सर्व राहणार विखरण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.