Home » शैक्षणिक » *एरंडोलच्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भेट…….!*

*एरंडोलच्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भेट…….!*

  1. *एरंडोलच्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भेट…….!

    ​एरंडोल प्रतिनिधी -येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डि .डी.एस.पी.महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे नुकतीच महाराष्ट्र ग्रामीण बँक (शाखा एरंडोल) येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. एस.वाय.बी.ए. आणि टी.वाय.बी.ए. च्या विद्यार्थ्यांना बँकिंग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील व उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांचे प्रोत्साहन लाभले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.एस. वानखेडे व प्रा. विजय गाढे यांनी या भेटीचे यशस्वी नियोजन केले.
    ​ या शैक्षणिक भेटी दरम्यान शाखा व्यवस्थापक नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना बचत-चालू खाती, कर्ज सुविधा आणि डिजिटल बँकिंगमधील सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली.
    तसेच बॅंकेचे असिस्टंट मॅनेजर सुशांत घोळके यांनी भविष्यातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.विद्यार्थ्यांनी बँकेच्या विविध विभागांना भेटी देऊन अंतर्गत कामकाजाची प्रक्रिया जवळून समजून घेतली.
    ​ यावेळी बॅंकेचे कॅशियर ​मयुर पाटील, बॅंक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात ‘ युफोरिया 2K26’ चा जल्लोष, सांस्कृतिक आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध………!* *” ​विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा.” डॉ. विजय शास्त्री यांचे प्रतिपादन………!*