Home » क्राईम » *एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*

*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*

  1. *एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*


    ​एरंडोल प्रतिनिधी – शहरातील हायवे लगत असलेल्या हॉटेल्सवर प्रशासकीय पथकाने धडक कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर दणका दिला आहे. या कारवाईत दोन नामांकित हॉटेल्समधून अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.​२३ मार्च २०२६ रोजी तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हायवेवरील प्रमुख हॉटेल्सची तपासणी केली. यामध्ये खालील हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.त्यात ​हॉटेल जत्रा येथे एक घरगुती गॅस सिलिंडर अवैध व्यावसायिक वापर म्हणून जप्त.तर ​हॉटेल मयुरी गार्डन येथे नियमांचे उल्लंघन करून वापरले जाणारे एक सिलिंडर जप्त.​याशिवाय हॉटेल शिवानंद आणि हॉटेल कृष्णा यांचीही कसून तपासणी करण्यात आली.
    ​ ​पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक वैराळकर व पुरवठा निरीक्षक वैशाली पाचपोर यांच्या पथकाने हे सिलिंडर जप्त करून तसा अहवाल माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे.
    ​ “अनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा रक्ताचा सडा, अमळनेर नाक्यावर भीषण अपघात, कंटेनरच्या जोरदार धडकेत एरंडोलचे प्रतिष्ठित शेतकरी ठार……..!* ​ *बोगद्याच्या अभावी आणखी एका निष्पापाचा बळी, परिसरात संतापाची लाट……..!*

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*