Home » सरकारी » *एरंडोल तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतीच्या चाव्या महिलांच्या हाती……..!*

*एरंडोल तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतीच्या चाव्या महिलांच्या हाती……..!*

  1. *एरंडोल तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतीच्या चाव्या महिलांच्या हाती……..!*

    एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकींसाठी सरपंच पदाचे आरक्षण ८ जुलै २०२५ रोजी मंगळवारी ठरविण्यात आल्यानंतर बुधवारी ९ जुलै २०२५ रोजी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली डि.डी.एस.पी.महाविद्यालयाच्या इनडोअर हाॅलमध्ये महिला सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली.त्यात तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीपैकी २७ गावांमध्ये महिला राज येणार आहे.त्यामुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलणार आहेत.याप्रसंगी तहसीलदार प्रदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय घुले, महसूल सहाय्यक अधिकारी मधुकर नंदनवार, महसूल सहाय्यक जगदीश ढमाले उपस्थित होते.
    अनुसूचित जाती – १,अनुसूचित जमाती – ४,ना.मा.प्र.- ५,सर्वसाधारण -३,याप्रमाणे १३ महिला सरपंच पदांचे आरक्षण थेट काढण्यात आले.व ११ वर्षीय मुलगी गायत्री सोनवणे हीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून अनुसूचित जाती – १, अनुसूचित जमाती -१,ना.मा.प्र.२, सर्वसाधारण -१० याप्रमाणे महिला सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
    एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायत महिला सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले.
    *अनुसूचित जाती महिला* – वैजनाथ,निपाणे
    *अनुसूचित जमाती महिला* – पिंपळकोठा बु.,रिंगणगांव, कासोदा,पिंप्री प्र.चा., हणमंतखेडे बु.,
    *ना.मा.प्र.महिला* – विखरण -चोरटक्की,पिंप्री बु.,आडगांव, खेडी खु.,दापोरी,भालगांव, जवखेडे खु.
    *सर्वसाधारण महिला* – पातरखेडे,नानखुर्द बु., रवंजे बु.,नानखुर्द खु.,उत्राण अ.ह.,तळई,गालापूर – मुगपाट, आनंदनगर,ताडे, ब्राह्मणे – आंबे, हणमंतखेडे सिम, खर्ची खु.,नागदुली.
    यावेळी जि.प.चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन,दत्तू पाटील,आडगांव,बाळू पाटील,टोळी विविध गावांचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व गाव खेड्यांचे पुढारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या