Home » सरकारी » *एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अमोल बागुल यांनी स्विकारला कार्यभार…!*

*एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अमोल बागुल यांनी स्विकारला कार्यभार…!*

*एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अमोल बागुल यांनी स्विकारला कार्यभार…!*

एरंडोल – येथे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नंदुरबार येथून बदली होऊन आलेले अमोल प्रभाकर बागुल यांनी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पदभार स्विकारला.त्यांची एकूण २४ वर्षे सेवा झालेली असून नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा, येवला, नाशिक या ठिकाणच्या नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर त्यांची सेवा झालेली आहे.
अमोल बागुल यांनी पहिल्याच दिवशी विभाग निहाय न.पा.कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला व यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सुचना देखील केल्या.एरंडोल शहराची स्वच्छता व आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा व इतर मुलभूत सुख सुविधा पुरविण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू यासाठी तसेच एरंडोल शहर स्वच्छ, सुंदर, सुरळीत वाहतुकीचे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या