- *एरंडोल नगरपालिकेतर्फे शहिदी समागमानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन………..!*
एरंडोल प्रतिनिधी – ‘ हिंद की चादर ‘ म्हणून ओळखले जाणारे शिख धर्माचे ९ वे गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त येथील नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या संदर्भात नगरपरिषद कार्यालयात शिख बांधवांची बैठक घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र ठाकूर होते.मुख्याधिकारी अमोल बागुल हे बैठकीस उपस्थित होते.
यावेळी शहिदी समागमाचे महत्त्व व नागरिकांचा सहभाग याबाबत सविस्तर चर्चा होऊन विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.शहरातील प्रमुख चौक व मोक्याच्या ठिकाणी पोस्टर लावून तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म स्वातंत्र्य,मानवता व अन्यायाविरुद्ध लढा देत आपल्या प्राणांची आहुती दिली होती.शहिदी समागम हा सामाजिक ऐक्य, सहिष्णुता व मानवतेचा संदेश देणारा असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
यावेळी विनायक कुलकर्णी, रविंद्र लाळगे, कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर व नागरिक उपस्थित होते.
