- *एरंडोल तालुक्यात ई पिक पाहणी अंतिम टप्प्यात………!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात शासनामार्फत ई पिक पाहणी मोहीम १० डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून शेतकऱ्यांकडून पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकामी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पिक विमा, नैसर्गिक आपत्ती,ॲग्रोस्टॅक इतर शासकीय अनुदान मिळण्यासाठी प्रत्येक हंगामात पिक पाहणी करणे गरजेचे आहे.म्हणून २५ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाईन नोंदणी पुर्ण करून घ्यावी.असे आवाहन तहसीलदार गोपाळ पाटील यांनी केले आहे.
एरंडोल तालुक्यात ई पिक पाहणी नवीन मोबाईल ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.एरंडोल तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४४ हजार ०१४ हेक्टर आहे.तर रब्बी पिकांचे क्षेत्र १० हजार ९९० हेक्टर आहे.तालुक्यात अत्यल्प भूधारक शेतकरी संख्या १ हजार २०१ आहे.अल्पभूधारक शेतकरी संख्या १ हजार १७२ आहे.बहुभूधारक शेतकरी संख्या ३६ हजार ३२४ आहे.असे सांगण्यात आले.
*एरंडोल तालुक्यात ई पिक पाहणी अंतिम टप्प्यात………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
