- *एरंडोल न.पा.निवडणूक प्रक्रिये संबंधीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती…….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिये संबधीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांनी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी न.पा.सभागृहात पत्र परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
मतदार याद्या, नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे,मतदान केंद्रे,इ व्ही एम मशिन, बॅलेट युनिट,मतदान अधिकारी, नामनिर्देशन पत्र स्विकारणे, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची खर्चाची माहिती, प्रभाग निहाय निवडून यावयाचे नगरसेवक,आचार संहितेचे पालन आदी माहिती विस्तृतपणे देण्यात आली.
याप्रसंगी प्रास्ताविक न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले.सुत्र संचालन न.पा.चे कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर यांनी केले.आभार प्रदर्शन हितेश जोगी यांनी केले.या पत्र परिषदेत विजय महाजन,शेख सांडू,प्रा.आर.एस.पाटील, राजेंद्र चौधरी, विशाल सोनार, इम्रान सय्यद, पोलीस स्टेशन प्रतिनिधी अनिल पाटील यांचेसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
