- *एरंडोल येथे ओमनगरात एकाच रात्री कुलुपबंद घरांत दोन ठिकाणी चोरी….!*
एरंडोल – दुचाकी व टिव्ही चोरीच्या दोन घटनांना आठवडा उलटला नाही तोच घरांची कुलुपबंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ओमनगर येथे कटरने कडी कोयंडा कापून भटू वामन चौधरी यांच्या घरातून जवळपास २५ हजार व ३ ते ४ ग्रॅम सोने एवढ्या ऐवजावर डल्ला मारला.तर अनिल पाटील यांच्याकडील चोरीच्या घटनेत किरकोळ रोकड लंपास करण्यात आली.प्रा.आर.एम.पाटील यांच्या घरी कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चोरांना अपयश आले.एकाच रात्री दोन तीन ठिकाणी चोरीचा प्रकार झाल्यामुळे नवीन वसाहतींमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
एरंडोल येथील ओमनगरामधील भटू चौधरी हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी कटरने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून २५ हजार रुपये रोख व ३ ते ४ ग्रॅम सोन्याचे दागिने ह्या ऐवजावर हात मारला.त्याच परिसरात प्राचार्य अनिल पाटील यांच्या कुलूपबंद घरात आधी चॅनेलगेट तोडले नंतर घराचा कडी कोयंडा तोडण्यात आला.मात्र किरकोळ पैसे वगळता चोरांच्या हाती काही एक लागले नाही.नंतर प्राचार्य अनिल पाटील यांच्या शेजारी सेवानिवृत्त प्रा.आर.एम.पाटील यांच्या घरी कडी कोयंडा तोडण्याचा चोरांचा प्रयत्न असफल झाला.
दरम्यान कुलूप लावलेल्या घरात चोरी करण्याच्या या प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्यामुळे कुलूप लावून परगावी जाताना नागरिकांनी सावधानता बाळगावी.असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.केवळ पोलीस प्रशासनावर विसंबून न राहता नागरिकांनी स्वतः सतर्क राहावे.असे जाणकारांचे मत आहे.