Home » क्राईम » *एरंडोल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या……..!*

*एरंडोल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या……..!*

  1. *एरंडोल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या……..!*


    एरंडोल प्रतिनिधी – येथे खोल महादेव मंदिर परिसरात अतुल अशोक सुतार, वय ३४ वर्षे यांनी त्यांचे राहत्या घरात मागच्या खोलीत घराचे छतास असलेल्या लोखंडी सळईला दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान अद्याप आत्महत्ये मागील कारण स्पष्ट झाले नाही.
    किरण अशोक सुतार यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यानुसार त्यांचा लहान भाऊ अतुल याने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्याची पत्नी भारती किरण सुतार हिने आरडाओरड करत आक्रोश केला.त्यामुळे गल्लीतील लोक जमले.मयुर मराठे,गणेश शिरसाळकर व गल्लीतील इतर लोकांनी अतुल सुतार याला खाली उतरवून खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.
    हेडकॉन्स्टेबल दिपक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या