- *एरंडोल येथे तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा…..!*
![]()
![]()
![]()
![]()
एरंडोल प्रतिनिधी – येथे तहसील कार्यालयात १५ मार्च २०२५ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव अहिरराव हे होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.ग्राहक दिनी कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबर पुरवठा अधिकारी व उपस्थित मान्यवरांची बाजारपेठेत मोहीम काढून प्रत्यक्ष ग्राहकांना भेटून ग्राहक जागृती करावी आणि भाषणबाजीला कृतीची जोड द्यावी.अशी अपेक्षा जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर यांनी केले.यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे पदाधिकारी कैलास महाजन, उज्वला देशपांडे, पत्रकार विकी खोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरेश पांडे यांनी केले.तर आभारप्रदर्शन ईश्वर बिऱ्हाडे यांनी केले.यावेळी प्रा.शरद महाजन शैलेश चौधरी,विकी खोकरे,कमर अली सय्यद,गोदाम व्यवस्थापक ऋषीप्रसाद पोळ व नागरिक उपस्थित होते.