Home » क्राईम » *एरंडोल येथे बस स्टँड समोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर पोलीसांची धाड……!*

*एरंडोल येथे बस स्टँड समोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर पोलीसांची धाड……!*

  1. *एरंडोल येथे बस स्टँड समोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर पोलीसांची धाड……!**दोन कंपार्टमेंटमध्ये अश्लील चाळे करताना मिळून आले तरूण तरूणी……..!*
  2. एरंडोल प्रतिनिधी  – येथे एरंडोल पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलात हाॅटेल मैत्री कॅफेवर ९ जुलै २०२५ रोजी बुधवारी दुपारी अचानक धाड टाकली असता अश्लील चाळे करताना दोन कंपार्टमेंटमध्ये युवक, युवतीच्या दोन जोड्या मिळून आल्या.एरंडोल सारख्या खेडेवजा शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या धाडीत तरूण तरूणींना गैरकृत्य करण्यासाठी कॅफे मालकाने जागा दिल्याचे समोर आले आहे.बसस्थानक परिसर गजबजलेला भाग असून या भागात दिवसाढवळ्या अनैतिक कृत्य गेल्या काही महिन्यांपासून होत असल्याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.
    एरंडोल येथील पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी पो.काॅ.अनिल पाटील पो.काॅ.संजय पाटील पो.काॅ.किरण  पाटील,पो.काॅ.दिपक पाटील व पो.काॅ.वैशाली पाटील  यांच्या पथकाने सदर कॅफेवर बुधवारी दुपारी अचानक छापा टाकला.त्यात एका कंपार्टमेंटमध्ये एक तरुण व एक तरूणी तर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एक तरुण व एक तरूणी असे पडदा टाकून असभ्य वर्तन करतांना रंगेहाथ मिळून आले.कॅफेचालक रविंद्र दिनकर पाटील वय २३ वर्षे,रा.जवखेडा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महाविद्यालयीन तरूण तरूणींना छोटे छोटे पार्टीशनचे कंपार्टमेंट तयार करून तेथे त्यांना अश्लील चाळे अथवा असभ्य वर्तन करण्यासाठी कॅफेमध्ये लाईट बंद करणे, ग्राहकांना एकांत देणे, त्यांना अश्लील कृत्य करण्यास मुभा देत असताना कॅफे चालक मिळून आला.विशेष हे की कॅफे चालकाने कोणतीही परवानगी कॅफे चालवण्यासाठी घेतली नसल्याचे उघडकीस आले.
    याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान धाडीत मिळून आलेले युवक युवतीच्या दोन्ही जोड्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.महाविद्यालयाच्या अल्पवयीन मुला मुलींना अश्लील कृत्य करण्यास कॅफे चालक रविंद्र दिनकर पाटील हे परवानगी देतात.अशी गोपनीय माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती.त्यावरून पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या