- *एरंडोल येथे महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत उमरदे येथील ३१ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा वितरण बाबत आदेशाचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते वाटप………!*
![]()
एरंडोल प्रतिनिधी – महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची बैठक येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.यावेळी उमरदे येथील ३१ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा वितरणाबाबत आदेशाचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार दिलीप पाटील हे उपस्थित होते.
सरकारी जमिनीवर १ जानेवारी २०११ पुर्वी रहिवास प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या व्यक्तींची अतिक्रमणे नियमाकुल करण्यासंदर्भात ग्राम विकास विभाग शासन निर्णय १६ फेब्रुवारी २०१८ नुसार सर्वेक्षण करण्यासंदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पात्र व्यक्तींचे अर्ज व त्यासोबत १ जानेवारी २०११ पुर्वीचे रहिवासाचे पुरावे जोडून प्रस्ताव एरंडोल पंचायत समिती कार्यालयामार्फत उपविभागीय अधिकारी स्तरिय शक्ती प्रदत्त समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

