-
एरंडोल प्रतिनिधी – येथे पंचायत समिती सभागृहात पुरवठा विभाग तहसील कार्यालय एरंडोल यांचे तर्फे २४ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोलचे नवनियुक्त तहसीलदार गोपाळ पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रा.शिवाजीराव अहिरराव, तालुका पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी, उपाध्यक्ष ॲड.विलास मोरे, एरंडोल शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास महाजन,उज्वला देशपांडे, गौमाता राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या जयश्री पाटील व रश्मी दंडवते,सरला लहू पाटील ग्राहक कल्याण फाउंडेशन चे कुंदनसिंग ठाकूर याप्रमाणे मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उज्वला देशपांडे यांनी यावर्षीच्या ‘ डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा ‘ संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले.ॲड.विलास मोरे,प्रा.शिवाजीराव अहिरराव,रवी पाटील,जयश्री पाटील यांनी ग्राहक हक्क संरक्षण याबाबत विशेष प्रबोधन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विवेक वैराळकर पुरवठा निरीक्षण अधिकारी एरंडोल,वैशाली पाचपोर पुरवठा निरीक्षक एरंडोल, ऋषीप्रसाद पोळ व निरज सुरळकर पुरवठा लिपिक यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश पांडे यांनी केले.तर आभारप्रदर्शन निरज सुरळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील पत्रकार बंधू व रास्त भाव दुकानदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
