- *एरंडोल येथे शिवसेना उबाठा पक्षात रघुनाथ ठाकूर यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात रघुनाथ राजाराम ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवारी प्रवेश केला.यावेळी उबाठाचे जिल्हा संघटक करण पवार यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचे स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटक महानंदाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर महाले, तालुका प्रमुख रविंद्र चौधरी, युवासेना तालुका प्रमुख शुभम पाटील, शहरप्रमुख जयदीप महाजन, समाधान महाजन, सुनील चौधरी, प्रसाद दंडवते, सुनील मराठे आदी उपस्थित होते.
