- *एरंडोल येथे सर्वपक्षीय शोकसभेत महात्मा फुले विद्यालयात अजित पवार यांना आदरांजली………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे ३१ जानेवारी २०२६ रोजी महात्मा फुले विद्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी २ मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण केली.सर्वप्रथम अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील,अमित पाटील, नगराध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर, महानंदाताई पाटील,विजय महाजन, शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी,अरूण माळी, जगदीश पाटील, जगदीश ठाकूर यांनी अजित पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीतील आठवणी सांगून शोकभावना व्यक्त केल्या.विशेष हे की यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांना शोकभावना व्यक्त करतांना अश्रू अनावर झाले.
यावेळी रमेश महाजन,दत्तू पाटील,अभिजित पाटील, डॉ.सुरेश पाटील,अतुल पाटील,अजिज सर, प्रभाकर पाटील, अशोक चौधरी,डॉ नरेंद्र पाटील,रविंद्र जाधव, रविंद्र पाटील, समाधान पाटील,के.डी.पाटील, डॉ प्रशांत पाटील,रवि चौधरी,विशाल सोनार, राजेंद्र महाजन, राजेंद्र शिंदे,ॲड.अहमद सय्यद,एन.ए.पाटील,प्रा.आर.एस.पाटील, सुनील पाटील,ॲड.मधुकर देशमुख, सचिन पाटील, दिलीप पांडे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शोकसभेचे आयोजन विजय महाजन, अमित पाटील व के.डी.पाटील यांनी केले.
