- एरंडोल प्रतिनिधी – पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक कल्पकता लढवत तयार केलेल्या एकूण १८१ उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रतिभा सुर्वे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरविंद बडगुजर, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांनी केले. त्यांनी विज्ञान प्रदर्शनामागची भूमिका मांडताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे महत्त्व विशद केले.या प्रदर्शनात विविध गटांतून १८१ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.त्यात उच्च प्राथमिक गटाची (६ वी ते ८ वी) १०२ उपकरणे,माध्यमिक व उच्च माध्यमिक गटाची (९वी ते १२ वी) ५७ उपकरणे,शिक्षक व परिचर गटात प्राथमिक शिक्षक १७ उपकरणे, माध्यमिक शिक्षक २ उपकरणे, उच्च माध्यमिक शिक्षक २ उपकरणे आणि परिचर ३ उपकरणांचा सहभाग होता.
यावेळी प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रयोगांची तज्ज्ञ परीक्षकांमार्फत निवड करून त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेते खालीलप्रमाणे.
१.माध्यमिक गट:
प्रथम: वैष्णवी एकनाथ महाजन (सम्यक माध्यमिक विद्यालय, एरंडोल)
द्वितीय: नैतिक प्रमोद पाटील (रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल)
तृतीय: साहिल योगेश माळी (माध्यमिक विद्यालय, खर्ची)
२. उच्च प्राथमिक गट:
प्रथम: जयश्री पाटील व सायली पाटील (जि. प. शाळा, टाकरखेडे)
द्वितीय: कश्वी संदिप पाटील (सम्यक माध्यमिक विद्यालय, एरंडोल)
तृतीय: मानसी रविंद्र चौधरी (गोपी गोल्ड हायस्कूल, एरंडोल)
३. प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य:
प्रथम: निलिमा सतिष मराठे (बाल शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर, एरंडोल)
या प्रसंगी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि आधुनिक शेती यांसारख्या विषयांवर सादर केलेल्या उपकरणांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
