- एरंडोल – एरंडोल विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीचे नियोजन करण्यात आले असून नियोजनाप्रमाणे १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मतदारांना मतदान चिठ्ठी वाटप होणार आहे.तसेच मतदान यंत्रे व व्हि व्ही पॅट निवडणूकीसाठी तयार करण्याचे काम १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून डि.डी.एस.पी.महाविद्यालयातील इनडोअर हाॅल,म्हसावद रोड, एरंडोल येथे होणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी दिली आहे.१० नोव्हेंबर व ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी ११ वाजेपर्यंत तर दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत कमल लाॅन्स, धरणगांव रोड, एरंडोल येथे निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण होणार आहे.याच दोन दिवशी रा.ति.काबरे विद्यालय येथे ई व्ही एम ,व्हि व्ही पॅट हाताळणी प्रशिक्षण होणार आहे.तसेच या ठिकाणी मतदान कर्मचारी यांचे टपाली मतदान चार खोल्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्रांवर होणार आहे.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता व २२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता इनडोअर हाॅल, म्हसावद रोड, एरंडोल येथे मतमोजणी प्रशिक्षण होणार आहे.मतदान पथकांना साहीत्य वाटप १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता इनडोअर हाॅल मागील मैदानावर होणार आहे.असे सांगण्यात आले.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.मतदान झाल्यानंतर मतदान झालेल्या सिलबंद ई व्ही एम व व्हि व्ही पॅट मशीन्स इनडोअर हाॅल मधील सुरक्षा कक्षामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून डि.डी.एस.पी.काॅलेज , इनडोअर हाॅल, म्हसावद रोड, एरंडोल येथे मतमोजणी होणार आहे.