जळगाव – चिफ हमीद तडवीरा
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे डंपर व ट्रॅक्टर द्वारे गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करून लूट केली जात आहे
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ग्रामपंचायत च्या मालकीची सुलवाडी रोड वरील भगवती मंदिर परिसरात गट क्रमांक ४४४ व ४५० हा भुखंड मोठमोठ्या बरड्या असून या बरड्यांचे बऱ्याच दिवसांपासून उत्खनन सुरू आहे काही लोकप्रतिनिधी च्या आशिर्वादाने कंत्राटदार यांच्या मुजोरी ने मोठमोठे डंपर व ट्रॅक्टर द्वारे बाहेर गावी वाहतूक करीत आहेत ग्रामपंचायत ची कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे दादागिरीने कुणालाही न जुमानता वाहतूक करीत आहेत ऐनपुर येथे मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय असून यांना सुध्दा ही होणारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर कधी दिसले नाहीत का? का कंत्राटदार व यांचे काही आर्थिक संबंध तर नाही ना? असा नाराजीचा सूर गावकऱ्यांतून निघतांना दिसत आहे ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य यांनी अवैध गौण खनिज वाहतूकीकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे उत्खनन करण्यात येणाऱ्या गौण खनिजांचा कुठलाही महसूल ग्रामपंचायत कार्यालयाला मिळत नाही मग कोणाच्या परवानगीने हे उत्खनन सुरू आहे कंत्राटदार याला कोणाचा आशिर्वाद आहे मंडळ अधिकारी,तलाठी,नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत तात्काळ अवैध गौण खनिज वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे