एरंडोल – तालुक्यातील कढोली येथे अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली, त्यानुसार पाहणी केली असता दारु निर्मितीचे साहित्य व अन्य वस्तू आढळून आले,ते पोलिसांकडून नष्ट करण्यात आले.कढोली येथील कारवाईसाठी एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार स.फौ. चंद्रकांत पाटील पो.हे.काॅ.राजेश पाटील , पो.हे.काॅ.जुबेर खाटीक,पो.कॉ.गणेश पाटील,पो.ना.दत्तात्रय ठाकरे यांनी कढोली येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली. त्यात घटनास्थळी ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार गावठी दारू देखील आढळून आली.त्यावर कारवाई करत ते उद्धवस्त करण्यात आले. या धडक कारवाईने परिसरातील गावठी दारू हातभट्टी चालविणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कढोली ता. एरंडोल येथे महेंद्र उखा कोळी नावाचा इसम हा त्याचे राहते घराचे आडोशाला काटेरी झुडपात सार्वजनिक जागी गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ,मोह मिश्रीत कच्चे रसायन व गावठी हात भटटीची तयार दारू त्याचे कब्जात बाळगुन तयार दारूची चोरटी विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी कढोली येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकण्यासाठी स.फौ. चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस स्टॉफ व दोन पंच असे एरंडोल पोलीस स्टेशन येथून लॅपटॉप व रेड कामी लागणारे इतर साहीत्य घेवून खाजगी वाहनाने रवाना होवून कढोली गावी पोहचले.बातमीची खात्री केली असता एक इसम हा त्याचे घराचे आडोशाला असलेल्या झुडपात तीन दगडांच्या चुलीवर एक मोठी लोखंडी टाकी ठेवून त्यात काठीने काहीतरी हलवतांना दिसला. बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्याचेवर अचानक सकाळी ७.३० वाजता छापा टाकून महेंद्र उखा कोळी वय ५० वर्षे रा.कढोली,ता.एरंडोल यास रंगेहाथ पकडले.त्याच्या कब्जात मिळून आलेल्या २० हजार रुपये किंमतीची प्रत्येकी ५० लिटर मापाच्या ४ कॅन मध्ये २ हजार लिटर तयार गावठी दारू, ३५ हजार रुपये किंमतीचे प्रत्येकी २०० लिटर मापाचे ५ प्लास्टीक ड्रम मध्ये असलेले सुमारे १ हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, मोह, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन,२हजार ५०० रूपये किंमतीचे ५० लिटर मापाच्या लोखंडी ड्रम मध्ये असलेले गुळ, मोह, नवसागर मिश्रीत पक्के उकळते रसायन असे एकूण ५७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल कारवाई करीत नष्ट करण्यात आला.