Home » क्राईम » *कत्तलखान्यासाठी जागेवरील आरक्षण कमी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन…..!*

*कत्तलखान्यासाठी जागेवरील आरक्षण कमी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन…..!*

  1. *कत्तलखान्यासाठी जागेवरील आरक्षण कमी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन…..!*

    एरंडोल – येथे गट नं.१६३ मध्ये कत्तलखाना बनवण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.या जागेच्या परिसरात राम मंदिर, महादेव मंदिर, गणेश मंदिर, भवानी माता देवस्थान, हनुमान मंदिर, इत्यादी मंदिरे असल्यामुळे नागरिकांनी या आरक्षणास तीव्र विरोध केला आहे.सदर आरक्षण जनतेच्या भावनांचा विचार करून त्वरित उठवण्यात यावे.अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    सदर जागेजवळ वस्ती असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.तसेच या परिसरात नदी व नाले असल्याने प्रदुषणाचा प्रश्न भेडसावणार आहे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    निवेदनावर राम मंदिर,तोंडापूर संस्थेचे अध्यक्ष व सचिव राजीव मणियार, मनोज बिर्ला, अरूण पाटील, मुरलीधर पाटील, नंदकिशोर वाणी, नितीन वाणी, आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या