एरंडोल येथे विद्या नगरातील डॉ.धीरज उर्फ राहुल मराठे हे घराला कुलूप लावून पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यानी घराच्या दोन्ही लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सुमारे पन्नास हजार रुपये रोकड व तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या लंपास करून पोबारा केला ही घटना मंगळवारी रात्री घडली बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोरील रहिवाशाच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याबाबत डॉक्टर यांना भ्रमणध्वयीद्वारे कळविले याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.
एरंडोल येथील विद्यानगरामध्ये डॉ राहुल उर्फ धीरज मराठे हे पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाहण्यासाठी गेले होते त्यांच्या पश्चात अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराच्या लोखंडी व लाकडी अशा दोन्ही दरवाजांना लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाट उघडून कपाटातील पन्नास ते साठ हजार रुपये रोकड व 30 ते 35 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या लंपास केल्या बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोर राहत असलेले रमेश पाटील चोरीचा प्रकार लक्षात आला त्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉक्टर मराठे यांना याबाबत माहिती दिली. शहरातील भर वस्तीत चोरीची ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून नागरिकांमध्ये काही प्रमाणात भिती पसरली आहे.