-
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस साजरा..
-
-
नाशिक प्रतिनिधी – महिरवणी येथे महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था संचलित जिजाऊ प्राथमिक, सावित्रीबाई फुले माध्यमिक व अहिल्यादेवी उच्च माध्यमिक आश्रम शाळेत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस आयोजित पंधरवडा अंतर्गत दि. 3 /9/ 2025 रोजी सकाळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री खांडवी सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी सरपंच शांताताई गोराळे, माजी सरपंच पंडित गोराळे व शांताराम वागळे आदी ग्रामस्थ हजर होते तदनंतर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासींच्या पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या कोणी बिरसा मुंडा तर कोणी तंट्या भिल तर कोणी ख्वाजा नाईक आदि वेशभूषा केलेल्या होत्या मुलींनी आदिवासींचे पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या प्रभात फेरीमध्ये विविध घोषणांनी महिरावणी परिसर दणाणून सोडला होता गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थिनींनी तारफा नृत्याची कला सादर केली त्यात शिक्षकांनीही सहभाग नोंदविला सर्व गावकरी तारफा नृत्य बघून आनंदित झाले
सदर कार्यक्रमात यशस्वीते साठी प्राथमिक मुख्याध्यापक श्री अहिरे माध्यमिक मुख्याध्यापिका सो बर्वे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल बैरागी सर यांनी केले.


