- अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकीग्रामीण भागात वसलेल्या ज्ञानदीप विद्यालय बेलखेड या शाळेची विद्यार्थिनी गौरी शंकर शिंदे हिला अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला असून ग्रामीण भागातील या विद्यार्थिनीने कुठलाही शिकवणी वर्ग न लावता अभ्यासातील सातत्य चिकाटी व जिद्दीच्या भरोशावर यश संपादन केले त्याबद्दल ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने गौरी शिंदे हिचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शाळेची उभारणी केली असून आज मी जो सत्कार स्वीकारत आहे त्याची ही फलश्रुती आहे असे मत गौरी शिंदे हिने व्यक्त केले.शिक्षक हा निस्वार्थ भावनेने आपले कार्य करतो त्यांचे विद्यार्थी ही त्या शिक्षकांची ओळख असते विद्यार्थ्यांचे यश म्हणजे शिक्षकांचे यश आहे आई वडिलांनंतर मुलावर सर्वाधिक संस्कार करणारी व्यक्ती म्हणून शिक्षकाकडे पाहिल्या जाते विद्यार्थ्यांचे यश शिक्षकांना निश्चितच मोठा आनंद देऊन जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थीही सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे विचार मुख्याध्यापक बंडू तावडे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण कत्तुलवाड तर प्रमुख उपस्थिती म्हणून शंकरराव शिंदे, कविता शिंदे, डॉक्टर गणेश शिंदे, बंडू तावडे, संजय गोवंदे, सुषमा पाटील, प्रकाश कदम, बबन कदम, अरविंद चेपुरवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास वानखेडे तर आभार प्रदर्शन संजय गोवंदे यांनी केले.