*घरासमोर मोकळ्या जागेत लावलेले ट्रॅक्टरची चोरी…….!*
- एरंडोल प्रतिनिधी – येथे मरिमाता चौकात चालकाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभे केलेल्या ट्रॅक्टरची १७ जुलै २०२५ रोजी रात्री चोरी झाली.सदर ट्रॅक्टर हे निलेश मनोज चावरिया यांच्या मालकीचे असून जवळपास २ वर्षांपासून विनोद सुरेश खंडारे हा सदर ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत आहे.विशेष हे की सदर ट्रॅक्टर नुकतेच खरेदी केलेले असून त्याचा आर टी ओ कडून नंबर प्राप्त झालेला नाही.ट्रॅक्टर हे चालक विनोद खंडारे याच्या घरासमोर मोकळ्या जागेत उभे करण्यात आले होते.१७ जुलै २०२५ च्या रात्री भल्या पहाटे ट्रॅक्टर चोरी केल्याचे उघडकीस आले.
ट्रॅक्टरची शोधाशोध करूनही ते मिळून आले नाही.म्हणून अखेर विनोद खंडारे याने एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली.समाधान अनिल पाटील व ललित आनंदा महाजन यांनी ट्रॅक्टर चोरल्याचा संशय तक्रारीद्वारे व्यक्त केला आहे.सदर ट्रॅक्टरचा चेसिस एम बी एन ए व्ही ५३ एन ई आर टी बी ३०३२४ असा असून ७४४ माॅडेल स्वराज कंपनीचे आहे.तर त्याची किंमत ७ लाख रुपये आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक पाटील हे करीत आहेत.