- एरंडोल : येथे एरंडोल विधानसभेसाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा एक भाग म्हणून जेष्ठ नागरिक व दिव्यांग जनांचे गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया दि. 08/11/2024 रोजी 16 एरंडोल मतदार संघात मतदान केंद्रांवर 173 मतदारांसाठी पार पाडण्यात आली. गृहमतदानाचे उद्देश- मतदानाची टक्केवारी वाढविणे, वृद्ध व दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत. यांसाठी निवडणूक आयोगाने गृहभेटीद्वारे मतदान ही संकल्पना राबविण्याचे ठरविल्याने एरंडोल विधानसभा मतदार संघात
- निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप पाटील तहसीलदार एरंडोल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उल्हास देवरे तहसीलदार पारोळा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अमोल बागुल मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल तसेच नोडल अधिकारी विजय अहिरे सहाय्यक गटविकास अधिकारी एरंडोल यांच्या सहकार्याने सदर प्रक्रिया पार पडली. गृहमतदानाची सुविधा प्राप्त झाल्याने 85+ (वयोवृद्ध) मतदार व दिव्यांग मतदार बंधू भगिनीसाठी मतदानाची सुविधा घरोघरी जाऊन उपलब्ध करून दिली. सदर प्रयोग अत्यंत चांगल्याप्रकारे यशस्वी झाल्याने वृद्ध व दिव्यांगजनांनी समाधान व्यक्त केले. यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी सदर कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली