Home » क्राईम » ठाणेदार संतोष मनवर यांच्या तत्परतेने दरोडा पडण्याच्या आत चार आरोपी जेरबंद शिंदगी शिवारातील शेतात दबा धरून बसलेल्या 5 जणामधील एक फरार

ठाणेदार संतोष मनवर यांच्या तत्परतेने दरोडा पडण्याच्या आत चार आरोपी जेरबंद शिंदगी शिवारातील शेतात दबा धरून बसलेल्या 5 जणामधील एक फरार

ठाणेदार संतोष मनवर यांच्या तत्परतेने दरोडा पडण्याच्या आत चार आरोपी जेरबंद

शिंदगी शिवारातील शेतात दबा धरून बसलेल्या 5 जणामधील एक फरार

प्रतिनिधी -अजीज खान  ढाणकी

दरोडा घालण्याच्या उद्देशाने दि . 11 ऑक्टोंबरच्या 2024मध्यरात्री 1 वाजताचे सुमारास शिंदगी शिवारातील शेतात 5 जण दबा धरून बसलेले असल्याची एका व्यक्तीने फोनवरून बिटरगाव पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून बिटरगाव पो स्टे चे ठाणेदार संतोष मनवर हे ताफ्यासह तत्काळ तेथे पोहचले व शेतात दबा धरून बसलेल्या चौघांना गावकऱ्यांच्या मदतीने पकडून त्यांचे कडून धारदार चाकू , पेंचिस , लोखंडी रॉड , दोन मोटार सायकल असा एकूण 91 हजार 100 रुपयांचा ऐवज हस्तगत करून पोलीसांनी 4 जणांना ताब्यात घेतले अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला .पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दि . 11 ऑक्टोंबर 2024 रोजी मध्यरात्री एक वाजताचे सुमारास शिंदगी येथील पोलीस पाटील पांडुरंग वांगे यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती दिली की,सिंदगी शिवारातील जनार्दन नल्लेवाड यांच्या शेतातील डीपी जवळ 5 जण दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेले आहेत ,अशी माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर ,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे , पोलीस कर्मचारी रवी गिते, निलेश भालेराव देविदास हाके,बालाजी मस्के,चंद्रमणी वाढवे हे शासकीय वाहनाने सिंदगी येथे पोहोचले असता सर्व संशयित जनार्धन नल्लेवाड यांच्या शेताजवळ असलेल्या सिंगल फेज डीपीजवळ अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेले दिसले .मध्यरात्री 2:20 वाजता त्यांना सिंदगी येथील नागरिकांच्या मदतीने पकडण्यास गेले असता पोलिसांना पाहताच पाचही जण पळून जात असताना त्यांना मोठ्या शिताफीने पकडण्यात आले .त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे अनुक्रमे लक्ष्मण टोकलवाड वय ( 26 ) ,मिलिंद राऊत वय (32 ) ,दिनेश डांगे वय( 24) ,सतीश टोकलवाड वय 30 वर्ष ,सर्व राहणार डोल्हारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील असल्याचे त्यांनी सांगितले .तसेच अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेलेल्या इसमाचे नाव गणेश बट्टेवाड वय (24) रा. डोल्हारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड सांगितले तेव्हा पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता लक्ष्मण टोकलवाड याचेकडे पाचशे रुपये किमतीचा एक धारदार स्टील कोयता,मिलिंद राऊत याच्याकडे पाचशे रुपये किमतीचा धारदार चाकू ,दिनेश डांगे याचेकडे 100 रुपये किंमतीची पेंचिस व मिरची पूड ,सतीश टोकलवाड याच्याकडे काळ्या रंगाचा लोखंडी रॉड व ब्राह्मणगाव रोडच्या बाजूला लपवून ठेवलेल्या दोन मोटरसायकल असा एकूण 91 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला .सदर आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन पूर्वतयारीने दरोडा घालण्याचे तयारीत असताना बिटरगाव पोलीसांनी हत्यारासहित पकडले .त्यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता , आर्म ॲक्ट अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर ची कार्येंवाही मा.कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. पीयूष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर ठाणेदार पो. उप. नी. शिवाजी टिपूर्णे पोहेका रवी गिते, पोलीस कॉन्स्टेबल देविदास हाके, निलेश भालेराव, हिंमत जाधव, बालाजी मस्के,उद्धव घुगे यांनी केली पुढील तपास पो. उप. नी. शिवाजी टिपूर्णे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या