निवडणूक निरीक्षक यांची एरंडोल तालुक्यास निवडणूक तयारीच्या संदर्भात आढावा भेट…
प्रतिनिधी – एरंडोल येथे निवडणूक निरीक्षक ब्रजेश कुमार यांनी काल दि २९/१०/२०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदारसंघास भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रदीप पाटील तहसीलदार एरंडोल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उल्हास देवरे तहसीलदार पारोळा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल बागुल मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल, तसेच माननीय निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी, श्री बाविस्कर उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पारोळा हे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना १६ एरंडोल विधानसभा मतदारसंघाची सविस्तर माहिती दिली व निवडणूक तयारीचा आढावा दिला. तसेच निवडणूक निरीक्षक यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूम, मतमोजणी ठिकाण मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र यांना भेट देऊन पाहणी केली व महत्वपूर्ण सूचना दिल्या .ō