- *निवृत्ती वेतन व विधवा वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हयातीच्या दाखल्या संदर्भात आवाहन……..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी विधवा वेतन योजना या योजनांच्या लाभार्थ्यांच्या हयातीचा दाखला संबधी ॲप विकसित करण्यात आले आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना सदर ॲपद्वारे हयातीचा दाखला देणे सोयीचे होणार आहे.अशी माहिती तहसीलदार गोपाळ पाटील व नायब तहसीलदार अमोल बन यांनी दिली आहे.
एरंडोल तालुक्यात राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या शहरी ७१० व ग्रामीण ३७२३ याप्रमाणे आहे.राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी शहरी २ व ग्रामीण लाभार्थी १८ आहेत.इंदीरा गांधी विधवा वेतन योजनेचे शहरी लाभार्थी संख्या १५७ व ग्रामीण संख्या ५०५ आहे.या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला देण्यासाठी अद्यावत आधार कार्ड व आधार कार्डावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सेतू कार्यालय किंवा तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना शाखा एरंडोल येथे २० जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येईल.तरी सर्व लाभार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून आपला डेटा अद्यावत करावा.सदर कालावधीमध्ये हयाती बाबत प्रत्यापन न केल्यास लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही.असे एरंडोल तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
