- शिवाजी शिंदे प्रतिनिधी —
- सेलू : दि.7 न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सखी सावित्री व विशाखा समितीकडून कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ. अभिलाषा जोगदंड, सरकारी वकील ॲड रूपाली आम्ले, पोलीस शिपाई राहूल गोरे, मुख्याध्यापक बी. ए. नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, प्रनयना तेलगोटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जोगदंड यांनी गुडटच – बॅडटच, वैद्यकीय समस्या यावर तर ॲड. आम्ले यांनी अल्पवयीन गुन्हेगारां साठीचे कायदे, शिक्षा याविषयी माहिती दिली. तर पो कॉ गोरे यांनी गुन्हे व शिक्षा तसेच विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे फोन नंबर यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय भागवत यांनी केले. सुत्रसंचलन डी.एस. मोरे यांनी तर आभार रामेश्वर गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव नागरे, मंजुषा रेंगे, विष्णू गजमल, नारायण काष्टे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.