- *पिक अप गाडीच्या धडकेत धरणगांवचा दुचाकीचालक ठार…..!*
एरंडोल प्रतिनिधी- भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक धनराज आधार महाजन रा.हनुमान नगर धरणगांव वय 35 वर्ष हा जागीच ठार झाला.ही दुर्घटना १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एरंडोल म्हसावद रस्त्यावर उमरदे गावानजीक वळणावर घडली.धनराज हा पल्सर कंपनीच्या दुचाकीने एरंडोल कडून म्हसावदकडे जात असताना एम एच २० इ एल ५७७८ क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या पिक अप गाडीने दुचाकीला समोरून धडक दिली.अपघातातील दुचाकीला नंबर प्लेट नव्हती.या धडकेत महाजन याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला.मृताच्या भावाने एरंडोल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत मृताच्या वयाबाबत उल्लेख नाही.
हेड काॅन्स्टेबल अशोक मोरे, स.पो.उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

