Home » सरकारी » प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत एरंडोल नगरपरिषदे मार्फत घरकुल मेळाव्याचे आयोजन

प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत एरंडोल नगरपरिषदे मार्फत घरकुल मेळाव्याचे आयोजन

  1. : प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत एरंडोल नगरपरिषदे मार्फत घरकुल मेळाव्याचे आयोजन

    एरंडोल प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) चे प्रभावी अंमलबजावणीकामी नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी एरंडोल नगरपरिषद मार्फत दि.०७/०१/२०२६ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील मेळाव्यात योजनेची संपूर्ण माहिती तसेच मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. त्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

    यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी प्रास्ताविकात सागितले कि, पालिकेने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १७८ लाभार्थीचे घरकुल मंजूर करून ते पूर्ण देखील करून घेतले आहेत. आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी सुरु झालेली असून त्यात प्रथम प्रकल्प अहवालात एकूण ३० लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्याचे बांधकाम सुरु आहेत. तसेच १५ लाभार्थीचा दुसरा प्रकल्प शासनास सादर आहे.

    नगरअध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना मांडले कि, केंद्र शासनाची लोकहिताची असलेली प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांचे घ्यावा त्यासाठी नगरपरिषदेकडून सर्व नागरिकांना सहकार्य तसेच मार्गदर्शन केले जाईल. तरी सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे संपर्क करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

    यावेळी लाभार्थीची ऑनलाईन नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक एस आर ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक कक्ष अधिकारी भूषण महाजन यांनी सुत्रसंचालन केले. रचना सहायक सुमित उमराणे यांनी आभार मानले. ‘कार्यक्रमास सभा अधीक्षक हितेश जोगी, कर निरीक्षक जनार्दन येवले, लेखापाल शरद राजपूत, पाणीपुरवठा, अभियंता जितेश पाटील यांच्यासह पालिका कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या