Home » सरकारी » प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांच्या एका नोटीसीची कमाल अन थांबले आजीचे हाल..!

प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांच्या एका नोटीसीची कमाल अन थांबले आजीचे हाल..!

  1. प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड यांच्या एका नोटीसीची कमाल अन थांबले आजीचे हाल..!

    एरंडोल:-कायदा किंवा नियम हा माणसाच्या कल्याणासाठी असतो . कायद्याचा आधार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी एका आजीला न्याय मिळवून दिला. त्यामुळे वृद्धापकाळात निराधार झालेल्या वृद्ध महिलेला आधार देण्यात आला. उतार वयात वृद्ध महिला किंवा पुरुष यांना काठीचा आधार घ्यावा लागतो त्याबरोबर जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला काही बाबींचा आधार सुद्धा महत्त्वाचा ठरतो. प्रांताधिकारी गायकवाड यांनी खऱ्या अर्थाने मानवतेचे दर्शन घडवले.
    दोन आठवड्यापूर्वी मुलगा व सून स्वतःच्या घरात राहू देत नाहीत व ते मला त्रास देतात मारहाण करतात म्हणून घराचा ताबा मला देण्यात यावा ‌ असा अर्ज एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्याकडे एका आजीने केला होता. या प्रकरणात मुलगा व सून यांना नोटीस काढून बजावण्यात आली. पुढील तारखेवर मुलगा व सून हजर झाले त्यांना कायद्यातील तरतुदी समजावून सांगण्यात आल्या याआधी नियमानवये काय कार्यवाही होऊ शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले दोन्ही पक्ष समपुदेशन ऐकून घरी गेले, दुसऱ्याच तारखेच्या आत मुलगा व सून यांनी आजींचे घर सोडून देऊन दुसरीकडे राहायला गेले. तारखेवर आलेली आजी आनंदाने घरी परत गेली. परत जाताना आजीने प्रांत अधिकाऱ्यांना
    आशीर्वाद देत आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या