- *बापाला मारहाण करणाऱ्या रिल्स स्टार मुलाच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक….!*
एरंडोल – मुलाकडून होणाऱ्या छळाला व मारहाणीला त्रासून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या रिडल्स स्टार मुलगा हितेश याच्या हत्येप्रकरणी नामदेव सखाराम पाटील,वय ५५ वर्षे, रविंद्र सुरेश पाटील,वय २४ वर्षे, भालचंद्र नामदेव पाटील,वय २८ वर्षे या तीन जणांना एरंडोल पोलीसांनी अटक केली.त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना ३ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी हितेश पाटील याची पत्नी शितल हितेश पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान माजी सैनिक विठ्ठल पाटील यांच्या सुसाईड नोट नुसार पोलीसांनी भवरखेडा,ता.धरणगांव येथून थोड्या अंतरावर असलेल्या गोविंद बाबा धरणाच्या कोरड्या पात्रात पुरलेला हितेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.आणि जळगाव सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.हितेशचा मृतदेह काढण्यात आला त्यावेळी अमळनेर विभागाचे डि वाय एस पी विनायक कोते व तहसीलदार महेश सुर्यवंशी हे उपस्थित होते.