*भालगांव माध्यमिक विद्यालयात चिमुरड्यांनी घेतला विक्री कौशल्याचा आनंद…..!*
Oplus_131072
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील भालगांव येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘ आनंद मेळाव्याचे ‘ आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमासाठी डॉ.दिनकरराव चुडामण पाटील व सचिव डॉ.निलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच गोविंदा मराठे यांनी केले.यावेळी चिमुरड्यांनी पदार्थ विक्रीचा आनंद घेतला.
खमंग रस्सा पोहा,पाणीपुरी,भेळ,गुलाबजामून, मसाला पापड,गोड बोरे, तसेच इतर स्वादिष्ट पदार्थांचे स्टाॅल लावण्यात आलेले होते.विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी माफक दरात स्टाॅलवरील पदार्थ विकत घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व पदार्थांचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिपक पाटील, महेंद्र पाटील, ठाकरे, रविंद्र पाटील, सचिन पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, खाटीक मॅडम,कृपाली पाटील,विजया पाटील,प्रतिभा पाटील,माया दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहकार्य केले.