एरंडोल ( प्रतिनिधी )
तालुक्यातील खर्ची येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप भगतसिंग पाटील रा खर्ची,ता.एरंडोल यांना भावाचा ॲक्सिडेंट केल्याचा राग आल्याच्या कारणावरून आरोपी राम जयसिंग पाटील रा.खर्ची,ता.एरंडोल व इतर १५ ते २० लोकांनी खर्ची बस स्टॉप जवळ जयदीप पाटील याच्या उजव्या पायावर कुऱ्हाड मारून दुखापत केली.तसेच तेथे जयदीप पाटील सोबत उपस्थित असलेल्या नितीन अरूण पाटील यांना आरोपींनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ.राजेश पाटील व सहकारी करीत आहेत.